अचूक मराठी व्याकरण- शासन नियमानुसार सुधारित मराठी वर्णमाला :
स्वर (14 )- अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ॲ ऐ ओ ऑ औ
स्वरादी ( 2 )- अं आ:
व्यंजन ( 34 )- क् ख् ग् घ् ङ्
च् छ् ज् झ् ञ्
ट् ठ् ड् ढ् ण्
त् थ् द् ध् न्
प् फ् ब् भ् म्
य् र् ल् व् श् ष् स् ह् ळ्
संयुक्त व्यंजने ( 2 )- क्ष ज्ञ
व्यंजने अपूर्ण उच्चारांची असतात हे दाखवण्यासाठी ती पाय मोडून लिहिलेली असतात जसे क् ख् ग् घ्
त्यात अ मिसळून अक्षरे तयार होतात
क् + अ = क
ख् + अ = ख
एकूण वर्ण= 52
बाराखडी की चौदाखडी?
व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते. अ आ इ इ उ ऊ ए ऐ ओ औ हे दहा स्वर, अं अ: हे दोन स्वरादी यांची चिन्हे व्यंजनांमध्ये मिळवून आपण बाराखडी तयार करतो. दोन नवीन स्वरांची भर पडल्यामुळे शासन नियमानुसार आपण आता चौदाखडी वापरतो.
क का कि की कु कू के कॅ कै को कॉ कौ कं क: